मराठी ऑडिओ गोष्टी · ४ ते ९ वर्षांसाठी
आजीच्या गोष्टी,
तुमच्या कल्पनेतून.
Aaji's stories, from your imagination.
संध्याकाळ झाली की आजी गोष्ट सांगते. तुमच्या मुलाचं नाव घेऊन, त्याच्या कल्पनेतली गोष्ट. फोन खाली ठेवा, डोळे मिटा आणि ऐका.

कसं चालतं?
How it works
गोष्टीचा प्रकार निवडा
प्राण्यांची, साहस, जादूची, मजेदार, रहस्य, झोपतानाची, अंतराळ, सण आणि संस्कृती.
आजीला सांगा
"आजीने गोष्ट निवडावी" किंवा "माझ्या कल्पनेची गोष्ट": एका हत्तीला चंद्रावर जायचं आहे...
ऐका
आजीच्या मायेच्या आवाजात गोष्ट सुरू होते. स्क्रीनवर वाचायचं नाही, फक्त ऐकायचं.
आठ प्रकारच्या गोष्टी
Eight kinds of stories
प्राण्यांची
साहस
जादूची
मजेदार
रहस्य
झोपतानाची
अंतराळ
सण आणि संस्कृतीतुमचं मूल गोष्टीचा हिरो
Your child is the hero.
आजी गोष्टीत मुलाचं नाव घेते, आणि मुलाच्या कल्पनेतून नवी गोष्ट रचते. नाव आणि मुलगा-मुलगी यानुसार मराठी व्याकरणही बरोबर बसतं.
- फक्त गोष्टी. मुलं AI शी गप्पा मारू शकत नाहीत.
- प्रत्येक गोष्ट मुलाच्या वयाला साजेशी: सोपे शब्द, छोटी वाक्यं, शांत शेवट.
- भीतीदायक काही नाही. गोष्टी मायेने संपतात.

आजीची पेटी
ऐकलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्या पेटीत जमा होतात. आवडती गोष्ट पुन्हा ऐकायची? पेटी उघडा. इंटरनेट नसलं तरी चालतं.
"महान लोकांच्या गोष्टी" मध्ये शिवाजी महाराजांसारख्या थोर व्यक्तींच्या गोष्टी मोठ्या मुलांसाठी, आजीच्या शब्दांत.
पालकांसाठी
For parents
जाहिराती नाहीत
जाहिराती नाहीत, ट्रॅकिंग नाही, लॉगिन नाही. मुलाला कुठलंही खरेदीचं बटण दिसत नाही.
पालक विभाग
प्लॅन, नाव आणि वय बदलणं, सगळी माहिती काढून टाकणं हे सगळं पालकांच्या पडद्यामागे.
सुरक्षितता
कल्पना आधी आणि नंतर तपासल्या जातात. काही खटकलं तर आम्हाला support.rascend@gmail.com वर कळवा.
काही गोष्टी मोफत आहेत. दर महिन्याला जास्त नवीन गोष्टींसाठी आजीची पेटी Plus. किंमत अॅपमध्ये तुमच्या देशाच्या चलनात दिसते आणि कधीही रद्द करता येते.